29.4 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

शृंगारपूरमधील दोन घरांमध्ये बिबट्या घुसला…

साऱ्या जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु झाला आहे....

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...
HomeRatnagiriस्थानिक व्यापाऱ्यांना सावरण्यासाठी रत्नागिरी व्यापारी महासंघाचा तोडगा

स्थानिक व्यापाऱ्यांना सावरण्यासाठी रत्नागिरी व्यापारी महासंघाचा तोडगा

कोरोना महामारीमुळे  मागील २ वर्ष स्थानिक व्यापारी व्यवसायातील मंदीमुळे फारच मेटाकुटीला आले आहेत.

मागील साधारण दीड ते दोन वर्ष कोरोनामुळे केला गेलेला संपूर्ण लॉकडाऊन आणि ऐन सणासुदीच्या कालावधीत ऑनलाइन खरेदी मुळे स्थानिक व्यापाऱ्यांना बसणारा फटका यातून मार्ग काढण्यासाठी रत्नागिरी व्यापारी महासंघाने नवा मार्ग शोधला आहे.

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून दसरा-दिवाळी-नाताळ अशी भव्य बक्षीस सोडत जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत ग्राहकांना तब्बल १५ लाखांच्या बक्षीसांची लयलूट करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरातील सुमारे शंभर दुकानामध्ये ही स्कीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आठवड्यात ऍक्टिवा गाडी आणि टीव्ही तर नाताळ सणापर्यंत दर आठवड्याला विविध आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहे. तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला मारुती वॅगनआर सीएनजी ही चारचाकी गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे  मागील २ वर्ष स्थानिक व्यापारी व्यवसायातील मंदीमुळे फारच मेटाकुटीला आले आहेत. त्यात भर म्हणून सर्वांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे वळल्याने, स्थानिक व्यापाऱ्यांना अतोनात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसायाला चालना मिळावी आणि आधीचे ग्राहक प्रत्यक्ष दुकानात येऊन खरेदी करावेत यासाठी शहरातील स्थानिक व्यापार्यांनी हि युक्ती शोधून काढली आहे.

ज्या व्यापार्यांनी या महाबक्षीस सोडत योजनेत सहभाग घेतला आहे यांच्या कडून लोकांनी खरेदी करावी. ग्राहकांना दुकानदारांकडून एक कुपन देण्यात येईल, त्याच कुपन वरून विजेत्यांना बक्षीस प्राप्त होणार आहे. स्थानिक व्यापायांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हमखास बक्षीस योजना रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत १५ लाख रुपये किंमतीची बक्षिस देण्यात येणार असून, या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा व महाबक्षीस योजनेतून लाखो रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी दवडू नये असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular