गेली दीड वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक स्तरावर विपरीत परिणाम होत असून ऑफलाइन शिक्षण देण्यात अडचणी असल्याने आणि राज्यातील पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून शाळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच शाळा केंव्हा आणि कशा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आत्ता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्याने अखेर राज्यातील सर्वच शाळा सुरु करण्याकडे सरकारने सकारात्मक पाऊले उचलली असून, त्यात महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे, येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे केवळ प्राथमिक शाळाच सुरु होणे राहिले होते ते सुद्धा आता सर्वच शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात प्राथमिक शाळांच्या स्वच्छता करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्हामध्ये अजूनही काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र अन्य जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या विळख्यात अजून नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाने माध्यमिक शाळा आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
माध्यमिक शाळांमधील एकूण सुरु असलेले शिस्तबद्ध कामकाज लक्षात घेऊन सरकारने आता ११ नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त प्राथमिक शाळा उघडण्यासाठी जाहीर केला आहे. अर्थात या संदर्भातील शासन नियमावली अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे नेमकी लहान मुलांची किलबिल केंव्हा सुरु होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.