24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपोलीस दलातील कर्मचार्यांसाठी गुड न्यूज

पोलीस दलातील कर्मचार्यांसाठी गुड न्यूज

पोलीस दलातील कर्मचार्यांसाठी शासनाने एक गुड न्यूज दिली आहे. पोलीस निरीक्षक पदासाठी आता पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना परीक्षा देता येणार आहे. पदासाठी आवश्यक असणाऱ्या अटी लक्षात घेऊन त्याप्रमाणे अर्हताप्राप्त कर्मचार्यांना वरील पदासाठीच्या परीक्षा देण्यास मान्यता मिळाली आहे.

त्याचप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या नव्या निर्णयाबाबत रत्नागिरी जिह्यातील १८ पोलीस कर्मचाऱ्यांना फायदा झाला असून या नव्या आदेशान्वये जिल्ह्यातील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार यांच्या पदोन्नतीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी काढले आहेत.

त्यामध्ये साधारण चार महिन्यांपूर्वी सुद्धा अनेक पोलीस कर्मचार्यांना  बढती मिळाली होती. त्याचप्रमाणे या बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले राजेंद्र यशवंत जाधव यांची पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशी बढती मिळाली आहे. पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या मोटार विभागातील राजेश नाईक, चिपळूणचे संदेश गुजर, ग्रामीण पोलिस स्थानकाच्या संजीवनी मोरे यांना बढतीपर पोलीस हवालदार पद मिळाले आहे.

पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शहर पोलिसांच्या लुकमान तडवी, दापोलीच्या मयुरा खांबे, फोर्स वनचे मनोज शिंदे, देवरुखच्या ज्योती धमणस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय कांबळे,  राजेश धनावडे, निखिल माने, दाभोळचे संजय धोपट, मंडणगडचे प्रशांत कांबळे,  राजाराम गायकवाड मुख्यालयाच्या रेखा राऊत,  अलोरेचे चंद्रकांत नाईक, पूर्णगडचे शेखर नुलके, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रसाद कुलकर्णी यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. मिळालेल्या पदोन्नतीमुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीय सुद्धा आनंदी झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular