29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiri२० ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम

२० ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राण्यांचे डॉक्टर रोटेरिअन भागवत हे विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत.

रत्नागिरीमध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले आहे. अनोळखी भागामध्ये गेल्यावर तर गाडीचा सुद्धा पाठलाग हे करत असतात. त्यामुळे रस्त्यावर चालणे सुद्धा या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापायी कठीण बनत चालले आहे. रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्यात झोपलेले कुत्रे काहीवेळा न दिसल्याने अनेकवेळा भीषण अपघात घडून येतात. त्यामध्ये मागील आठवड्यात मोकाट कुत्र्यांवर झालेले विष प्रयोग प्रकरण चांगलच गाजत आहे.

नगर परिषदेने या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झाले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावर बसून रस्ता पूर्ण जाम करणाऱ्या गुरांवर सुद्धा कोंडवाड्यात ठेवण्याची कारवाई करण्यात आली होती. पण कालांतराने काही प्राणीप्रेमी संस्थांनी अपुर्या सुविधा पाहता अशा प्रकारे जनावरांना कोंडण्यावर विरोध दर्शविला. त्यामुळे या गोष्टी तिथे स्थगित कराव्या लागल्या.

दि. २० ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राण्यांचे डॉक्टर रोटेरिअन भागवत हे विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत. रत्नागिरी नगर परिषदेने या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, साधारण एका शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियोत्तर उपचार याचा खर्च अंदाजे रू. २२००/- ते २५००/- रुपये  इतका येतो.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्राणीप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्यासाठी आपली आर्थिक मदत दिलेल्या बॅंक खात्यावर जमा करून पावती मिळवण्यासाठी ९६०४१४६८३० या क्रमांकावर  व्हाट्सअपद्वारे डिटेल्स पाठवावेत असे आवाहन प्रेसिडेंट रोटे विजय पवार यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० श्वानांच्या निर्बिजीकरणाचे लक्ष ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular