31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeEntertainmentश्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

श्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

अनेकांनी या गाण्याचे हिंदी वर्जन तसेच मराठी सह अनेक भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला मात्र योहानीच्या गाण्याला कुठेच तोड नाही. पण तरीही आता योहानीच्या या गाण्याचे हिंदी वर्जन कसे असणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागली आहे.

सोशल मीडियावर श्रीलंकन गायिका योहानी हिने मणिके मागे हिते या गाण्याने सर्वांना वेड लावले होते.  कोणाच नशीब कधी उघडेल सांगता येत नाही. योहानी आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. गायिका योहानी,  भूषण कुमार इंदकर यांच्या थँक गॉड सिनेमामधून डेब्यू करणार आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमामध्ये योहानीचे मणिके मागे हिते या जगप्रसिद्ध गाण्याचे हिंदी वर्जन प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.

योहानीच्या सिंहली भाषेतील गाण्यावर अख्खे जग फिदा आहेच. पण आत्ता तिच्याच आवाजात हे गाणे हिंदीमध्ये ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकार असणार आहेत.

थँक गॉड हा एक हलका फुलका कॉमेडी चित्रपट असून, केवळ करमणूक किंवा कॉमेडी नाही तर त्यातून एक सामाजिक संदेश देखील प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. सिनेमात मणिके मागे हिते हिच्या प्रसिद्ध गाण्याचे देसी वर्जन ऐकायला मिळणार या कारणानेच सिनेमाची चांगली चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध संगितकार तनिष्क योहानीचे हे हिंदी वर्जन कंपोज्द करणार आहेत. तर मनिके मागे हितेच्या हिंदी वर्जनचे लिरिक्स रश्मी विरागने लिहिले आहे.

श्रीलंकन गायिका योहानीचे मणिके मागे हिते हे गाणे केवळ श्रीलंकेतच नाही संपूर्ण जगभरात पसंतीस उतरले आहे. योहानी तिच्या गाण्यामुळे रातोरात स्टार बनली. मणिके मागे हिते हे गाणे यू ट्यूबवर अनेक दिवस ट्रेडिंग मध्ये होते योहानीने गाण्याच्या भारतातील कोलाबोरेशन विषयी सांगताना म्हटले की, मला इथे खुप प्रेम आणि सपोर्ट मिळाला. त्याचप्रमाणे तिने भूषण कुमार आणि संपूर्ण टीमचे आभार मानले, ज्यांनी माझ्या गाण्याचे हिंदी वर्जन प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देत आहेत.

सध्या सुद्धा अनेकांनी या गाण्याचे हिंदी वर्जन तसेच मराठी सह अनेक भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला मात्र योहानीच्या गाण्याला कुठेच तोड नाही. पण तरीही आता योहानीच्या या गाण्याचे हिंदी वर्जन कसे असणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular