29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeEntertainmentड्राईव्ह इन थिएटर, एक अनोखा प्रयोग

ड्राईव्ह इन थिएटर, एक अनोखा प्रयोग

मागील साधारण दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे आणि वाढत्या संसर्गामुळे राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या काळामध्ये तमाम प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेबसिरीज पाहिल्या. अनेक नवनवीन विषयाचे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रेक्षकांची पावलं पुन्हा मनोरंजन गृहांकडे वळवण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणून नुकतंच जगातील पहिल रुफ टॉप, खुल्या जिओ ड्राईव्ह इन थिएटरची घोषणा केली आहे. मुंबईतील बीकेसी परिसरामध्ये स्थित असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे ५ नोव्हेंबर रोजी हे ओपन एअर थिएटर सुरु होत आहे.

रिलायन्सने सुरु केलेला प्रीमियम शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मुंबईतील ग्राहकांना तंत्रज्ञान स्टाईल आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण अनुभव प्रदान करण्यासाठी सज्ज झाला आहे. मनोरंजन, खाद्य आणि रिटेल क्षेत्रात भारतातील हा पहिलावहिला अनुभव असून. हे ड्राईव्ह इन थिएटर सर्वोत्तम जागतिक अनुभव भारतात आणण्याच्या दृष्टीने आणि जगापुढे सर्वोत्तम भारताचे रुप दाखवण्याच्या दृष्टीकोनाने बांधण्यात आले आहे.

जिओ वर्ल्ड ड्राईव्ह हे भारतातील पहिले ओपन-एअर रूफटॉप थिएटर असून ५ नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन केले जात आहे. PVR सिनेमाद्वारे संचलित जिओ ड्राईव्ह इनमध्ये २९० कारची क्षमता आहे. शहरातील सर्वात मोठ्या सिनेमा स्क्रीन प्रेक्षकांना अविश्वसनीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सुसज्ज आहे. विशेषतः सध्याच्या काळात स्वतःच्या कारमधून चित्रपट पाहण्याचा एक अनोखा अनुभव देईल असे रिलायन्सतर्फे सांगण्यात आले आहे.

लवकरच जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे नाईन डाईन हे एक मल्टी-क्युझिन कॅज्युअल-डाइन लाँच होणार असून,  ज्यामध्ये जागतिक पातळीवरील नऊ खाद्य संस्कृतींचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे. म्हणजेच कारमध्ये बसल्या जागी तुम्हाला उत्तम चित्रपटांसह मनपसंत रुचकर जेवणाचाही अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा भव्य पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular