26.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraक्रूज ड्रग्स प्रकरणाला नवीन वळण, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

क्रूज ड्रग्स प्रकरणाला नवीन वळण, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

क्रूज ड्रग्स प्रकरण दिवसेंदिवस वेगळच वळण घेत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यापासून त्यांनी अधिकार्यांपासून ते संबंधित सर्वांवरच आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले असून त्यांनी मात्र यावर स्पष्ट मत व्यक्त केले असून कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री नवाब मलिकांनी केलेल्या आरोपावरून आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असून, त्याचा दुसरा साथीदार समीर वानखेडे आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आले होते. हे सगळं प्रकरण केवळ किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं असून या किडनॅपिंगच्या प्लानचा मास्टर माईंड मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज हे हॉटेल व्यावसायिक असून, आपले हॉटेल चांगले चालण्यासाठी शेजारील चांगल्या चालणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. आणि असल्या प्रकरणामध्ये समीर वानखेडे त्याला मदत करत असतो,  असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. यावरुन आता मोहित कंबोज यांनी सुद्धा मलिकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यांना योग्य भाषेत उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे,  असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक आता स्वत: हिट विकेट झाले आहेत. आता त्यांना काय करावं आणि काय बोलावं हे काही सुचत नाहीय,  असंही पुढे सांगताना कंबोज म्हणाले.

राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. मी नवाब मलिकांना विनंती करतो कि, राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींचे ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगावे, असा सवाल कंबोज यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular