25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriयावर्षी कार्तिकी एकादशी पारंपारिक पद्धतीने होणार साजरी

यावर्षी कार्तिकी एकादशी पारंपारिक पद्धतीने होणार साजरी

कोरोना काळामध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मागील दीड वर्षामध्ये प्रत्येक सणवार हा फक्त प्राकृतरित्या साजरा केला गेला. भाविकांना दर्शनाची सोय ऑनलाईन केली गेली होती. प्रत्यक्ष दर्शनाची सोय कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद ठेवण्यात आली होती.

कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर दसऱ्याला सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी शासनाने दिली. रत्नागिरी मधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या श्री विठ्ठल मंदिरात रुढी, परंपरेला अनुसरून आणि शासनाच्या कोविड विषयक नियमांचे पालन करून यंदाच्या वर्षी कार्तिकी एकादशी महोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

येत्या सोमवारी दि.१५ नोव्हेंबर रोजी एकादशी उत्सव आहे. कार्तिकीच्या उत्सवानंतर बुधवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रयोदशीला विठुराया परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होणार आहे. याकरिता सर्व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर देवस्थानने केले आहे.

यंदा १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा उत्सव असून, मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्तिकीच्या उत्सवावर निर्बंध आले होते. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनाचे सर्व आवश्यक नियम पाळून, धार्मिक पध्दतीने शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

या दिवसाची रूपरेषा साधारण याप्रकारे असेल. एकादशीच्या दिवशी पहाटे २.०० वाजता श्रींची महापूजा करून त्यांच्यावर पवमानयुक्त मंगलाभिषेक करण्यात येईल. यावर्षी महापुजेचा मान हा सौ.सविता कुलापकर यांना देण्यात आला आहे. पहाटे ४.०० नंतर काकड आरतीला सुरवात होईल. ६.०० वाजता काकडा लागल्यावर दिवसभर भजन, कीर्तनांचे कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून पार पडतील. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीनुसार, भार्गवराम मंदिर येथून दिंडीचे आगमन सकाळी ११.०० वाजता होईल.

मध्यरात्री परंपरेप्रमाणे श्रींची रथोत्सवाची सवाद्य दिंडी निघेल. दिंडीतील सर्व मंडळींना शासकीय कोविड नियम बंधनकारक राहतील. तसचे दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक मंडळींनीही सॅनिटर, मास्क, सोशल डिस्टन्स या मुख्य बाबींचे उल्लंघन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular