25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकाळोखाचा फायदा उठवत अंमली पदार्थ आणि दारूच्या पार्ट्या

काळोखाचा फायदा उठवत अंमली पदार्थ आणि दारूच्या पार्ट्या

स्वच्छ सुंदर रत्नागिरीचे सध्या रुपडे पालटून खड्डेमय रत्नागिरी असे म्हणावे लागत आहे. एकतर अख्खी रत्नागिरी खोदून काढण्यात आली आहे. त्यामध्ये आता शहरी भागात नवनवीन प्रकरणे बाहेर पडत आहेत. शहरातील मारुती मंदिर परिसरात  भरवस्तीत असलेल्या संसारे गार्डन जवळील रस्ता दारू व मादक पदार्थ सेवनाचा अड्डा बनल्याचे निदर्शनास येत आहे.

संसारे गार्डनला जाण्यासाठी दोन मार्ग असून , त्याच्या दोन्ही बाजूना असणाऱ्या रस्त्यावरती दारू पिऊन धिंगाणा करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याठिकाणी असलेल्या आडवाट आणि अंधाराचा फायदा घेत हे अवैध धंदे सुरु असून, काही वेळेला तर गार्डनमध्ये दारू सेवनाच्या कार्यक्रम एका बाजूला पार पडत असल्याचे त्या भागातील स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

येथिल बाथरूम आणि त्या सभोवताली गार्डन बंद असतानाही दररोज मद्य सेवनाचा कार्यक्रम सुरू असल्याने याठिकाणी अधिक प्रमाणात बाटल्यांचा खच पडत आहे  तसेच बिसलरी कंपनीच्या पाण्याच्या आणि सोड्याच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसत आहेत.

रस्त्याला असलेल्या काळोखाचा फायदा उठवत याठिकाणी गांजा चरससारखे अमली पदार्थांचे सुद्धा सेवन करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले असल्याचे बोलले आहे. याशिवाय रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या करून त्यातही मद्यपानाचा कार्यक्रम सुरू असतो. या ठिकाणी शहर पोलिसांचे गस्ती पथक फिरकत नसल्याने आणि पथदिप बंद असल्याने या अशा प्रकारानां मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे गंभीरपणे शहर पोलिसांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी येथील स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular