क्रुझ ड्रग्ज प्रकरणामध्ये एका मागोमाग एक अनेक मोठी मोठी नेत्यांची नावे पुराव्यासकट समोर येऊ लागल्याने अनेकांची गोची झाली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण कधी देवेंद्र फडणवीसांवर येऊन थडकले काही कळलेच नाही. नवाब मलिक यांनी केलेल्या सततच्या आरोप प्रत्यारोपांवर प्रत्युत्तर म्हणून अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना “बिघडे नवाब” असे संबोधले. त्यामुळे आत्ता नवाब मलिक यांनी सुद्धा पलटवार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरून तुफानी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरु आहे. दरम्यान, नवाब मलिकांच्या जावयाच्या घरात अंमली पदार्थ सापडल्याचा फडणवीस यांनी दावा केला होता. त्या विरोधात नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस वकिलामार्फत बजावलेली.
त्यानंतर आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंमध्ये आक्षेपार्ह असल्यानेत्यावर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रु नुकसानीची नोटिस पाठवली असून, या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांमध्ये हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा सज्जड इशारा दिला आहे.
या संदर्भात अमृता फडणवीस म्हणाल्या कि, मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये यांचे काही फोटो शेअर करून आक्षेपार्हपणे उल्लेख करण्यात आला. त्या विरोधात मी आयपीसीच्या विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रु नुकसानीची नोटिस पाठवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी एकतर बिनशर्त जाहीर माफी मागावी व ते ट्विट ४८ तासांत डिलिट करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.