28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...
HomeRatnagiriउचित लाभ जिल्ह्याला होण्यासाठी मी प्रयत्नशील - ॲड. दीपक पटवर्धन

उचित लाभ जिल्ह्याला होण्यासाठी मी प्रयत्नशील – ॲड. दीपक पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, आताच जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण, गृहतारण आणि पगारदार सहकारी संस्था मतदार संघातून बिनविरोध निवडून आल्याचे निकालपत्र दिले. ते म्हणाले,  सहकार पॅनेलचे नेते आणि अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे म्हणून अमजद बोरकर व माझी दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृतपणे सहकार पॅनेलचे १४ सदस्य निवडून आलो आहोत. मला सहकार पॅनेलच्या माध्यमातून सलग चौथ्यांदा संधी मिळाली असून, याबद्दल सर्व मतदार संस्था, पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा निवडून आल्याचा उपयोग सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी करणार आहे. बॅंकेचे अध्यक्ष किंवा अन्य कोणतेही पद मला नको. जिल्ह्यात सहकार चळवळीतून सर्वसामान्यांसाठी आश्वासक प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. अलीकडेच माझी थिंक टॅन्कवर राज्य सरकारने निवड केली आहे. या सर्व गोष्टी पूरक असून याचा उचित लाभ जिल्ह्याला होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले. सहकाराच्या दृष्टीने अव्वल कामगिरीमध्ये अग्रणी जिल्हा बॅंकांमध्ये साताऱ्यानंतर रत्नागिरीच्या बॅंकेचा क्रमांक लागतो.

बँकेच्या इतिहासात तीन चतुर्थांश सदस्य बिनविरोध निवडून येणे ही महाराष्ट्रात सर्वांत महत्वाची आणि दुर्मिळ गोष्ट समजली जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. बॅंकेने त्यांच्या नेतृत्वाखाली ठेवी ३०० कोटीवरून २३०० कोटीवर नेल्या. एवढ्या वर्षांत भरभरून यश मिळाले आहे.

बॅंक किंवा सहकार क्षेत्राचा विचार करता राजकारणाला येथे थारा दिला जात नाही. येथे फक्त अर्थकारणालाच महत्त्व दिले जाते. बॅंकेमध्ये राजकीय अभिनिवेशाला थारा नाही. येथे सर्व विचारसरणीचे लोक कार्रयत आहेत. प्रत्येकाच्या सहकार व अन्य क्षेत्रातील ज्ञानामुळेच बॅंक प्रगतीपथावर आहे, असे त्यांनी सांगितले. मला बिनविरोध संधी देणाऱ्या सर्व  संस्था त्यांचे मतदार प्रतिनिधी या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद देतो असे ॲड दीपक पटवर्धन म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular