26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraकोरोना लसीकरणाबाबत सरकारचे कडक धोरण

कोरोना लसीकरणाबाबत सरकारचे कडक धोरण

देशभरामध्ये कोरोनाने घातलेला धुमाकुळ लक्षात घेता, लवकरात लवकर दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करण्याचे शासनाकडून आवाहन केले जात असून, देखील त्याकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दृश्य समोर येत आहे.

पूर्वीसारखे कोरोना लसीच्या डोसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत नसून, योग्य पुरवठा होत असून आता शिल्लक सुद्धा अनेक डोस आहेत. पण दुसरा डोस घेण्याकडे, अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारने त्यामुळे कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे यावरून दिसत आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस झालेले नसल्यास आता कॉलेजच्या प्राध्यापकांना कुठलाही लाभ मिळणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक आहेत. लसीचे दोन्ही डोस पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यास महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच केवळ आता ऑफलाईन परीक्षा देता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगात पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत काही नियम केले आहेत. सध्या कोरोना संक्रमण कमी झाले असले, तरी दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कॉलेजमधील विद्यार्थी-प्राध्यापकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

तर कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांना कोणताही सरकारी लाभ मिळणार नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, जेंव्हा आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय, लसीचे दोन्ही डोस घ्या त्यावर विद्यार्थी म्हणतात, की आमच्या सरांनी एकच घेतलाय, तर त्याला आमच्याकडे कोणतेही उत्तर नसेल. शिक्षण ऑनलाईन प्रकारे सुरु असल्याने काही शिक्षक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे कानावर आले आहे. परंतु, याबाबतीत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular