दापोली येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी असे प्रतिपादन केले कि, पक्षाचे सर्व निर्णय हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेले सर्व निर्णय आपल्याला मान्य करायला हवेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, ती जागा दुसर्या कोणाला देण्याची आवश्यकता नाही.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आघाडी करायची असेल तर हा सर्व निर्णय आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोडू तोपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करूया, शिवसेना सोडून गेलेल्यांना लवकरच पश्चाताप, भ्रमनिरास होईल. मात्र त्याना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेवू नका.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा सभापती योगिता बांद्रे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला व आज शिवसेनचे उपनेते उदय सामंत, आमदार योगेश कदम यांचे उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा असलेले कार्यकर्ते पक्षात घेतलेच पाहिजेत. ममता शिंदे म्हणाल्या की आज मी माहेरी आले आहे. त्यामुळे माहेरी आल्यावर जी वागणूक मिळते तीच वागणूक शिवसेना तुम्हाला देईल. शिवसेना हे कुटुंब आहे व कुटुंबातील सर्वांची काळजी कुटुंबप्रमुख घेत असतात, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दापोली येथे केले. भाजबद्दल बोलताना ते म्हणाले, येत्या निवडणुकीत त्यांना राज्यातील जनता मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही.