22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSportsआज टी-२० इंडिया आणि न्यूझीलंडची लढत

आज टी-२० इंडिया आणि न्यूझीलंडची लढत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आजपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपासून टी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार तर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी या दोघांनी पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या प्लॉनबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, आम्ही सध्या अशा ठिकाणी आहोत जेथून प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगवेगळी टीम शोधत आहोत. कारण एकच टीम सर्व फॉर्मेटसाठी तयार केली तर त्यामध्ये खेळाडूंची दमछाक होते. चांगला खेळ अपेक्षित असेल तर, खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा सन्मान करणे आवश्यक आहे.

माझी इच्छा आहे की खेळाडू नेहमी फिट आणि ताजेतवाने राहिले पाहिजेत. हा आव्हानात्मक काळ आहे आणि मी खेळाडूंसोबत काम करू इच्छीत आहे. त्यांना पुरेपूर आराम मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे. खेळाडूंना व्यवस्थित आराम देखील मिळाला पाहिजे आणि अशा खेळाडूंना योग्य संधी देखील उपलब्ध झाली पाहिजे.

भारतीय संघामध्ये उत्साह आहे आणि नव्या उद्दिष्टांसह संघ पुढे देखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिनही फॉर्मेट महत्त्वाचे आणि या सर्व फॉर्मेटमधील खेळाडूंचे वर्कलोड मॅनेज केले जाणार आहे. माझा एकच ध्येय डोळ्यासमोर असेल की, संघातील खेळाडूंकडून तिनही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करून घेता आली पाहिजे.

माझ्या नेतृत्वाखाली खेळाडूंना त्याच्या पद्धतीने खेळण्याची मुभा असणार आहे. खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसेल. माझी इच्छा आहे की खेळाडूंनी मोकळेपणाने आणि उत्साहाने खेळावे. संघ यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या त्या सर्व आम्ही करणार असल्याचे रोहितने सांगितले. वर्कलोड मॅनेज करणे हे देखील महत्त्वाचे आहे. खेळाडू मशिन नाहीत, मोकळा वेळ काढणे फार गरजेचे असते.

RELATED ARTICLES

Most Popular