21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraसाई भक्तांसाठी खुशखबर

साई भक्तांसाठी खुशखबर

कोविड काळापासून सर्व बंद ठेवण्यात आलेली देवस्थाने, दसर्याच्या मुहूर्तावर सर्व भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मागील दीड ते दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आता परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लहान मोठी सर्व धर्मांची संस्थाने आता उघडण्यात आली आहेत.

शिर्डीमध्ये आत्ता फक्त साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने साई दर्शनासाठी १५ हजार ऑनलाईन आणि १० हजार ऑफलाईन अशा एकूण २५ हजार भाविकांना साई मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे साईभक्तांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

८ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला साईसंस्थानने भक्तांकरिता ऑफलाईन दर्शन पास, लाडू प्रसाद व श्रीसाई प्रसादालय सुरु करण्याबाबत विनंती पत्र दिले होते. त्यानंतर यावर निर्णय होवून श्रीसाईबाबा संस्थानला कोविड बाबतचे शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन दैनंदिन १० हजार भक्तांना ऑफलाईन दर्शनासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

त्यामुळे यापुढे साईदर्शनासाठी १५  हजार ऑनलाईन आणि १० हजार  ऑफलाईन अशा २५ हजार भाविकांना साई दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश स्वीकारला जाणार आहे. सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश करताना, कोरोना संदर्भित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

भाविकांनी शक्यतो पूर्वनियोजित ऑनलाईन दर्शन पासचे बुकींग करुनचं शिर्डीमध्ये यावे असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या वतीनं करण्यात आले आहे. बाहेरून शिर्डीमध्ये आल्यावर कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी दर्शन पासाचे आगाऊ बुकींग करणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular