24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा शेतकरी-लाकुड व्यापारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व वन राज्यमंत्री यांना निवेदन

रत्नागिरी जिल्हा शेतकरी-लाकुड व्यापारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व वन राज्यमंत्री यांना निवेदन

वनविभाग, रत्नागिरी यांचेकडून रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यापाऱ्यांना जळावू लाकूड, इमारती लाकूड, रिंगी, बांबू, चिवाकाठी इ. लाकूड बाहेरगावी नेण्यासाठी दरवर्षी वाहतूक पास दिला जातो. परंतु, कोरोना काळामध्ये चर्नी रोड, मुंबई येथील बंद असलेली शासकीय प्रिंटींग प्रेस अदयाप सुरू न झाल्याने नवीन वाहतूक पासबुकांची छपाई करण्यात आलेली नाही.

रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री व वन राज्यमंत्री यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा शेतकरी-लाकुड व्यापारी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.

वनविभाग, रत्नागिरी यांचेकडे शिल्लक असलेली पासबुके काही दिवसांपूर्वीच समाप्त झाली आहेत. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला असून नवीन पासबुकांची छपाई कधी होईल याची काहीच शाश्वती नसल्याने सर्व व्यावसायिक प्रचंड अस्वस्थ व संकटामध्ये आहेत. उत्पन्नाचा अन्य कोणताही मार्ग नसल्याने या शेतकरी व व्यावसायिकांपुढे दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

याबाबत रत्नागिरी जिल्हा शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत कैफियत मांडली आहे. वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे अगोदर चलनात असलेली जुनी वाहतूक पासबुके आहेत. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग, रायगड व सांगली जिल्हयामध्ये तेथील वनविभागाकडे अगोदर चलनात असलेली जुनी वाहतूक पासबुके त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. तशीच आम्हालाही देण्यात यावीत,  ही त्यांची मागणी आहे. जेणेकरून कुटुंबाची उपजीविका सुरु राहण्यासाठी त्यांचा व्यवसाय तरी सुरू राहिल आणि त्यांच्या आलेल्या संकटकाळात त्यांना काहीसा दिलासा मिळेल. तरी, याबाबत वनविभाग, रत्नागिरी यांना तात्काळ आदेश व्हावेत, अशी विनंती आम. जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular