20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunपूरग्रस्त भागातील नद्यांचे गाळ उपसण्याची मागणी

पूरग्रस्त भागातील नद्यांचे गाळ उपसण्याची मागणी

कोकणातील चिपळूण आणि महाड ही दोन्ही शहरे पुरग्रस्त आहेत व भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात महापुराची भीती हि कायमच आहे. यातून केंद्र सरकारने गाळ उपसण्याच्या उपाय योजनांवर मदतीचा हात द्यावा असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रत्यक्ष भेटून केले आहे.

प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, वाशिष्ठी व काजळी  नदीला दरवर्षी पूर येतो, या पुरामुळे अनेक समस्या उद्भभवल्या आहेत. यावर्षी जो महापूर आला त्यामध्ये महाड व चिपळूण ही दोन्ही शहरे उध्वस्त झाली आहेत.

गेल्या आठवड्यात दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेऊन प्रमोद जठार यांनी नाम.नारायण राणे यांना या संदर्भात प्रत्यक्ष लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नाम. राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील काही नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक घेण्याचे मान्य केले आहे.

या दोन्ही नद्यामधील गाळाचा लवकरात लवकर उपसा करणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारचे मंत्री व प्रशासन यंत्रणा केवळ आश्वासनेच देत आहेत. त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत आत्ता कालावधी कमी होत चालला आहे. जर आताच हा  गाळ उपसाला गेला नाही तर पुन्हा एकदा महापुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे , यासाठी केंद्र सरकारने कोकणातील या दोन्ही शहरांसाठी दिलासा द्यावा व त्या दोन्ही नद्यातील गाळ काढण्याबाबत उपाययोजना करावी असे आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे.

प्रमोद जठार यांच्या विनंतीची दखल घेऊन लवकरात लवकर यासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांचेबरोबर बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन ना.नारायण राणे यांनी श्री.जठार यांना दिले आहे. ही बैठक पुढील काही दिवसांमध्ये आयोजित केली जाईल, असे श्री. जठार यांनी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular