27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeInternationalब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लहान मुलांवरच्या चाचणीवर बंदी

ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लहान मुलांवरच्या चाचणीवर बंदी

लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांच्या रक्तात गाठी होत असल्याच्या बातमीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने, आता लहान मुलांवरील करण्यात येणाऱ्या या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे.

ब्रिटनमधील सात जणांना ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या लसीचा करण्यात येणाऱ्या लहान मुलांवरच्या वापर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मंगळवारी ऑक्सफर्डने ही माहिती प्रसिद्ध केली असून या लसीच्या डोसनंतर काही लोकांच्या रक्तात गाठी झाल्याच्या वृत्तावर आता संशोधन करणे सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक निवेदन जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, लहान मुलांवर या लसीचा वापर करण्यात येणार होता. या लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांच्या रक्तात गाठी होत असल्याच्या बातमीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने, आता लहान मुलांवरील करण्यात येणाऱ्या या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. कंपनीने ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीकडून त्यांनी केलेल्या या सर्व प्रकरणाच्या संशोधन अभ्यासाची अधिक माहिती मागवली आहे.

चार दिवसापूर्वी ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची कोरोनाची लस घेतल्यानंतर सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजते. तर ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या असून त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीने दिली होती.

Oxford-AstraZeneca

परंतु, एस्ट्राजेनेका, जागतिक आरोग्य संघटना आणि युरोपचे ड्रग रेग्युलेटर यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वारंवार सांगितले होते. रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका या लसीच्या वापरामुळे झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने देखील एस्ट्राजेनकाला क्लीन चिट देत सांगितले होते की, अद्याप लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली कोणतीही केस आढळलेली नाही. लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली असल्याने एस्ट्राजेनेका लस वापरण्यावर स्पेन, इटली जर्मनी आणि फ्रान्स या देशांत बंदी घालण्यात आली आहे.

जगभरात वेगवेगळ्या कोरोना वॅक्सिनची ट्रायल सुरु आहे. परंतु, सर्वच वॅक्सिनची ट्रायल फक्त  वयाने मोठ्या व्यक्तींवर करण्यात आलेली होती. दरम्यान, साध्याच्या घडीला तरुण मुलांमध्येच कोरोनाचे प्रमाण जास्त झाल्याचे दिसून येते आहे, तसेच लहान मुलांसाठीही कोरोना प्रभावी लसीची आवश्यकता आहे. त्यामुळे लहान मुलांवरही अनेक लसींचं परिक्षण करण्याचे ठरविले जात आहे. अशातच सध्या अनेक देशांमध्ये शाळा सुरु झाल्याने अनेक लहान मुल कोरोनाग्रस्त झाल्याचं समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular