29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriश्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शांतता, भाविकांची रीघ कमी

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शांतता, भाविकांची रीघ कमी

कोरोना काळापासून मागील दीड वर्ष श्री क्षेत्र गणपतीपुळे बंद होते. त्यामुळे आज दीड वर्षानंतर पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे येणार्‍या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर अंगारकीला भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध विभागांना तशा संदर्भित सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे पालन करुनच दर्शन दिले जाणार आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या दीड वर्षात आलेल्या अंगारकीला भाविकांना श्रीगणेशाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नव्हते. नवरात्रौत्सवापासून मंदिरे सर्वांसाठी खुली करण्यात आल्यामुळे, गेल्या काही दिवसात गणपतीपुळे येथील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी अंगारकी असल्याने या दिवशी किमान पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे येथे दाखल होणार, असा ठाम विश्वास प्रशासनाला आहे.

अंगारकीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यात विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये गणपतीपुळे-निवळी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने व साईडपट्ट्यांवर झाडे वाढून रस्त्यवर आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे यात्रेच्या आधी खड्डे भरावेत व झाडाच्या फांद्या तोडाव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

यात्रेवेळी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जयगड सागरी पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी मार्गदर्शक फलक लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. सध्या एस.टी. संप असल्याने भाविक चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने अधिक प्रमाणात दाखल होतील. यावेळी सागरी महामार्गावरील शिरगाव येथे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते,  त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

मंदिरात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टसिंगचा वापर करावा, प्रसादाचे वाटप करण्यात येऊ नये, रांगेमध्ये सॅनिटायझर वापरावे, लक्षणे जाणवणार्‍यांनी अँटिजेन टेस्ट करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. पण आज काहीस शांततेच चित्र गणपतीपुळेमध्ये दिसण्यात आले. एकतर एसटीचा संप, त्यात कोरोना नियम, आणि समुद्रावरील बंदीमुळे दरवेळेपेक्षा भाविकांची गर्दी कमी दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular