27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriवाशी बाजारात रत्नागिरी हापूसची दमदार एन्ट्री

वाशी बाजारात रत्नागिरी हापूसची दमदार एन्ट्री

हिंवाळ्याची सुरुवात झाली कि, साधारण आंब्याला मोहोर धरायला सुरुवात होते. आणि मग हळू हळू त्याचे पोटच्या मुलासारखे आंबा व्यावसायिक जतन करून त्याची वाढ करतात. दिसायला आणि चवीने जेवढा आंबा चांगला तेवढी बाजारात त्याला चांगली किंमत मिळते. अजून आंबा तयार होण्यासाठी साधारण ३-४ महिन्याचा कालावधी आहे. पण काही ठिकाणी आता आंबा तयार सुद्धा झाला हे ऐकून नवल वाटण्यासारखच आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथून चार डझन हापूसच्या चार पेट्या वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. फौजान शरीफ खिशे यांच्या बागेतील हा आंबा आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वाशी मार्केटला या हंगामात आंबा पाठवणारे हे पहिले बागायतदार ठरले आहेत.

आंब्याचे सिझन व्यतिरिक्त उत्पन्न घेण्यात बाणकोटचे बागायतदार फौजान खिशे यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या इथून यंदा हापूस हंगामात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हापूसच्या चार पेट्या बाजारात रवाना झाल्या आहेत. एवढ्या लवकर आंबा तयार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फौजान खिशे यांच्या बाणकोट येथील राहत्या घरामागील चार झाडांवर ऑगस्ट महिन्यात मोहर आला होता. याच कालावधीत पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. घराजवळ झाडे असल्यामुळे लवकर आंबा तयार होण्यासाठी फौजान यांनी काळजी घेण्यास सुरूवात केली होती. एकतर वातावरणामध्ये वारंवार होणारे बदल लक्षात घेता हि गोष्ट घडणे कठीण होते. परंतु, फौजान यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि काळजीने केलेले संगोपन याचेच हे आंब्याच्या रूपाने मिळालेले फळ आहे.

मागील २ वर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्ती, वादळ, भूकंप, पूर अशा गोष्टी घडत आल्या आहेत. कधी प्रखर उष्णता, कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular