27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraसर्व आरटीओ कार्यालयात लवकरच बसवणार सिम्युलेटर सिस्टीम

सर्व आरटीओ कार्यालयात लवकरच बसवणार सिम्युलेटर सिस्टीम

सध्याच्या जगात अगदी शाळेत शिकणारी मुले सुद्धा दोन चाकी आणि चार चाकी वाहने अतिशय चतुराईने चालवताना दिसतात. पण प्रश्न आहे तो एवढ्या लहान मुलांना पालक कशा काय बिनधास्तपणे गाड्या हातात देतात! त्यांच्या कडे ड्रायव्हिंग लायसन्स नसणार, त्यामुळे एखाद्या वेळी काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण!

गाडी कोणत्याही वयामध्ये शिकावी मात्र चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे. काही वेळेला खोल उतार असेल, निसरडा रस्ता असेळ तर काही क्षण पूर्ण ब्लांक व्हायला होऊन पटकन लक्षात येत नाही कि, आता काय केल पाहिजे? त्यासाठी वाहन चालविण्याचा कायम परवाना मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आणि आत्मविश्‍वास वाढवणारी नवीन यंत्रणा सर्व आरटीओ कार्यालयात लवकरच बसवण्यात येणार आहे.

सिम्युलेटर म्हणजे संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालविण्याची यंत्रणा, असे त्याचे नाव आहे. यामध्ये वाहन चालविताना आपण संगणकाच्या सहाय्याने जशी आपण प्रत्यक्ष गाडी चालवतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा आभासी पद्धतीने गाडी चालविण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे ब्रेक, क्लच, गिअर, ड्रायव्हिंग मनेजमेंट याचे योग्य ज्ञान मिळण्यास मदत मिळते.

परवानाधारकाची वाहनावर प्रत्यक्ष चाचणी होणारच. त्यासह सिम्युलेटरची चाचणी होणार आहे. जरी ती सक्तीची नसली तरी ती प्रत्येक आरटीओ कार्यालयात ती बसवण्यात येणार आहे. चढावात, गर्दीच्या ठिकाणी, तीव्र उतारात वाहन चालवण्याचा आत्मविश्‍वास याद्वारे मिळणार आहे. या यंत्रणेमुळे वाहन चालकांची कोणत्याही रस्तांवर वाहन चालवण्याची भीती नाहीशी होणार असून, विनासायास अपघातांवर नियंत्रण मिळवण्याचा परिवहन खात्याला एक प्रकारचा विश्‍वास आहे.

RELATED ARTICLES

Most Popular