27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraअंगारकीच्या मुहूर्तावर दिवेआगरच्या सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना

अंगारकीच्या मुहूर्तावर दिवेआगरच्या सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर दिवेआगर येथील सुवर्णगणपतीच्या मुखवट्याची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. नऊ वर्षापूर्वी दरोडेखोरांनी मंदिरातील सुवर्णमूर्ती आणि सोनं पळवून नेलं होतं. दरोडेखोरांनी विकलेलं सोनं पोलिसांनी छडा लावेपर्यंत वितळवले होते. हि गणपतीची मूर्ती एका पेटीमध्ये जमिनीखाली गाडलेल्या स्थितीमध्ये सापडली होती.

जेंव्हा त्या मंदिरामध्ये दरोडा घालण्यात आला तेंव्हा दरोडेखोरांनी तेथील दोन सुरक्षारक्षकांची गोळ्या घालून हत्या केली होती. मागील नऊ वर्षापासून ते वितळलेले सोने  मिळविण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु होते. सदर मूर्तीचे वितळवलेले सोनं राज्य सरकारकडे सोपविण्याचा निर्णय मा. न्यायालयानं दिले होते. सोनं पुन्हा मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देवून मुखवट्याचे पुर्न प्राणप्रतिष्ठापणा करणेबाबत मा. खा. तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता.

अखेर अंगारकीचा मुहूर्त साधून दिवेआगर ता. श्रीवर्धन येथील श्री गणेश मंदिर येथे सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार व त्यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. सदर कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. उदय सामंत,  मा. खा. श्री. सुनिल तटकरे , आ. श्री. भरतशेठ गोगावले, आ. श्री. अनिकेत तटकरे, पर्यटन मंत्री अदिती ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.

सुवर्ण गणेश मुखवट्याचे मंदिरामध्ये तब्बल ९ वर्षांनी पुन: प्रतिष्ठापणा होत असल्याने समस्त ग्रामस्थांसकट सर्वानाच अतिशय आनंद झाला असल्याचे तटकरे यांनी सांगितले त्याचप्रमाणे माननीय अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रतिस्थापना करण्यात आल्याने, त्यांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular