26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriराष्ट्रपतींचा तीन दिवसाचा महाराष्ट्र दौरा

राष्ट्रपतींचा तीन दिवसाचा महाराष्ट्र दौरा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा तीन दिवसाचा महाराष्ट्र दौरा आहे. त्यांच्या या दौर्याची रूपरेषा साधारण अशा प्रकारे आहे. त्यामध्ये ते ०६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या आंबडवे ता. मंडणगड येथे डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भेट देणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या डागडुजी कामी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून आंदोलन देखील छेडण्यात आले होते.

या भेटी दरम्यानच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीमध्ये सर्व संबधित विभागांनी करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली.  राष्ट्रपती ३ दिवसाच्या महाराष्ट्र  दौऱ्यात येत असून त्यात ते आंबडवे गावात असणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देणे नियोजित आहे.

त्याचप्रमाणे ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार आहेत. याबाबत खास. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. खासदार संभाजी राजेंनी त्यांच्या दिल्ली भेटी दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीसाठी निमंत्रण दिले होते आणि ते निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे.

आपल्या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यासच प्रतिसाद म्हणून राष्ट्रपती कोविंद ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर भेट देत आहेत. हि आपल्या सर्वांसाठीच नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. असे ट्वीट करत संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या दौर्याचे आणि सुरक्षिततेचे सर्व नियोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular