26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraमुंबई विमानतळावर आयफोन-१३ चा तस्करी साठा जप्त

मुंबई विमानतळावर आयफोन-१३ चा तस्करी साठा जप्त

देशामध्ये होणार्या आयफोनच्या तस्करीच्या साठ्याचा महसूल गुप्तचर संचालनालयाने पकडला आहे. मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन मालाची तपासणी केली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्सला हा माल हॉंगकाँगमधून आला होता. आयात माल वेगळाच आणि त्याच्या दस्तऐवजांमध्ये हा माल खोटेपणे मेमरी कार्ड म्हणून नोंद करण्यात आला होता.

या रोखलेल्या मालामध्ये एकूण ३६४६ आयफोन-१३ मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ, या वस्तू सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. ४२.८६ कोटी रुपये होती परंतु, मालाचे घोषित मूल्य फक्त ८० लाख रुपये दाखविले होते.

आयफोन-१३  मॉडेल सप्टेंबर २०२१ पासून भारतात विक्रीसाठी आले आहे. ज्याची मूळ किंमत रु. सत्तर हजार रुपये इतकी होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत १,८०,००० रुपये इतकी होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर ४४ %  इतके प्रभावी सीमाशुल्क लागू आहे. तस्कर आयफोन-१३ सारख्या नवीन उत्पादनांसाठी त्यांचे तस्करीचे नेटवर्क किती लवकर प्रस्थापित करतात हे या अत्याधुनिक मॉडेल्सच्या फोनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रयत्नातून आढळून आले आहे.

या कारवाईमुळे एक गंभीर आयातीमधील फसवणूक प्रकरण उघडकीस आली आहे. अशा प्रकारच्या लहान सह मोठ्या प्रमाणातील तस्करांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, देशाच्या आर्थिक सीमांचे रक्षक म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालय कायम सज्ज आहे. एक मोठा घोटाळा या कारवाईमुळे समोर आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular