कोरोनाचे वाढते संक्रमण आताच्या घडीला आटोक्यात येऊ लागले असल्याने संपूर्ण राज्य शंभर टक्केच्या दरम्यानच अनलॉक करण्यात आले होते. परंतु काल आलेल्या दक्षिण आफ्रिकेमधील रुग्णांमुळे अचानक नव्या व्हेरीयंट बद्दल अनेक चर्चा समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक राज्यांसकट संपूर्ण देशामध्ये अतिशय चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१५ डिसेंबर पासून सुरु होणार्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेबद्दल सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण कोणताही प्रवासी कोणत्याही देशातून भारतामध्ये प्रवेश करू शकतो. मागील २ वर्षाचा कोरोना कालखंड आता आटोक्यात येत आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करताना संबंधित प्रवाशाची कोविड १९ ची चाचणी ती देखील आरटी-पीसीआर निगेटीव्ह असणे बंधनकारक केले आहे.यामुळे महाराष्ट्रातून नित्येनेमाने जाणा-या प्रवाशांची अडचण होऊ शकते अशी देखील चर्चा आहे. त्यातूनच आज काही ठिकाणी महाराष्ट्रातील नागरिक आणि कर्नाटक पोलिस यांच्यात वाद होऊ लागला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी प्रशासना समवेत बैठक घेतल्यानंतर राज्यात बहुतांश ठिकाणी आरोग्य विभाग सतर्क राहिले आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेऊ लागले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकाराने RT-PCR चा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.
तसेच प्रशासनाने सर्व शिक्षण संस्थांना हा अहवाल ७२ तासांपेक्षा जुना नको असेही स्पष्ट केले आहे. याबरोबरच १२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत केरळ येथून आलेल्या वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अन्य विद्यार्थ्यांची RT-PCR चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून पसरणारा संसर्ग वेळीच आटोक्यात आणण्यास सहाय्य होईल.