29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeLifestyleसध्याच्या काळात निरोगी प्रतिकारक शक्ती गरजेची, लक्षणे आणि उपाय

सध्याच्या काळात निरोगी प्रतिकारक शक्ती गरजेची, लक्षणे आणि उपाय

दोन वर्षानंतर कोरोनाच्या भयावह कालखंडातून जनता आता कुठे बाहेर पडत होती तर त्यामध्ये आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमीक्रॉनने डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी संशयित तर काही ठिकाणी संक्रमित रुग्ण आढळल्याने एकूण धोका सध्या पुन्हा वाढत आहे.

ओमीक्रॉनसारखी लक्षणे दिसणारी अनेक प्रकरणे भारतामध्ये आढळली आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा लोकांमध्ये कोरोना व्हायरसबाबत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांवर कोरोना विषाणूचा त्वरित आणि अधिक परिणाम होताना दिसत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ज्या लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असते ती लोक लवकर आजारी पडत नाहीत. आपली रोगप्रतिकारक शक्ती ही पांढऱ्या रक्त पेशी आणि इतर अनेक घटकांनी बनलेली असते. अशा परिस्थितीत ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ते लवकर आजारी पडतात आणि अशाच इतर आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनाच लवकर संसर्ग होतो.

पाहूया आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे, हे कसे ओळखावे?

जर एखाद्याला सर्दी, खोकला अगदी वर्षाचे १२ महिने सतत राहत असेल आणि तुम्ही आजारी पडत असाल, बाहेर काही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेचच तुम्हाला संसर्ग झाला असेल, हवामान बदलताच अनेक समस्यांचा त्रास व्हायला सुरुवात होते अशांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे.

कमकुवत झालेली किंवा मुळातच असलेली रोगप्रतिकार शक्ती कशी ओळखावी आणि त्यावरील उपाय पाहूया थोडक्यात.

अनियमित किंवा झोप अपूर्ण झाल्याने,  डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे. सकाळी उठल्यानंतर फ्रेश न वाटणे, निरुत्साह जाणवणे,  लक्ष सतत विचलित होणे, अपचनाचा त्रास होणे, स्वभाव चिडचीडा होणे, वातावरण बदलाने  लवकर आजारी पडणे, जरास काम केल्यावर, काही अंतर चालल्यावर लवकर थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे जाणवतात.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ते पाहूया.

योग्य आणि वेळेवर आहार घेणे. आहारासोबातच ज्या फळांमध्ये सी व्हिटॅमिन आहे जसे कि, संत्री, किवी,  आंबा,  पेरू आणि लिंबू यांसारखी फळे खावी. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खायला हवे. ब्रोकोली या भाजी मध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त घटक असतात. अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.  किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

RELATED ARTICLES

Most Popular