24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriचांदसूर्या बसस्टॉपजवळ पोलिसांची झाडाझडती, लाखोंचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

चांदसूर्या बसस्टॉपजवळ पोलिसांची झाडाझडती, लाखोंचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची बेकायदेशिपणे वाहतूक करणार्‍या दोन संशयितांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये केली आहे. प्रशांत उर्फ बाबाजी विजय नाईक, सुंदर लक्ष्मण कुबल दोघे रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक बुधवारी रात्री खेडशी ते हातखंबा अशी गस्त घालत होते. तेव्हा त्यांना चांदसूर्या बसस्टॉपजवळून जाणारे टाटा इन्ट्रा वाहनाबद्द्ल संशय वाटला म्हणून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये विमल पान मसाल्याची १५  पोती, इतर तंबाखूची पॅकेट आणि सिगारेटचे ३३  बॉक्स असा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संशयितांकडून सुमारे ७ लाख ५० हजार ४००  रुपयांचे प्रतिबंधित पदार्थ आणि ४  लाख ५० हजारांची टाटा इन्ट्रा गाडी असा एकूण १२  लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई साधारण रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान चांदसूर्या बसस्टॉपजवळ करण्यात आली. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अशा प्रकारे बेकायदेशीर कामे करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात सतर्क झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बऱ्याच प्रमाणात अंमली पदार्थ यांची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्रीचे प्रमाण वाढले आहे. परंतु, बर्याचवेळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुद्देमालासह गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular