24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeIndiaभारतीय रेल्वेमध्ये आई आणि तान्हुल्यासाठी फोल्डेबल बेबी बर्थ

भारतीय रेल्वेमध्ये आई आणि तान्हुल्यासाठी फोल्डेबल बेबी बर्थ

अनेक वेळा रेल्वेतून रात्री अपरात्री प्रवास करताना आणि सोबत लहान मुल असेल तर विशेष करून महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एक तर रात्रीच्या वेळेचा प्रवास असेल तर झोप मिळणे गरजेचे असते. पण बाळामुळे ना धड आईची झोप पूर्ण होते ना प्रवासामुळे बाळाची.

त्यावर उपाय म्हणून तान्हुल्या बाळासह आईला रेल्वे प्रवासात विनासायास शांत झोप घेता यावी यासाठी श्रॉफ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी संशोधन करून तयार केलेल्या फोल्डेबल बेबी बर्थ या प्रोजेक्टला पेटंट मिळाले.

शिवाय समाजातील एक घटक, आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून ते संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्याची तयारीदेखील संशोधकांनी दर्शवली आहे. रेल्वेतील डब्यात आई व बाळ अशा दोघांना पुरेशी झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसते. त्यामुळे दोघांना सुद्धा रात्रभर छोट्याशा जागेत झोपावे लागते. त्यावर “फोल्डेबल बेबी बर्थ’  हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.

‘फोल्डेबल बेबी बर्थ’ हा आकाराने ७६ सेमी बाय २३ सेमीचा बर्थ आहे. जो साधारण १०-१२ किलो पर्यंत वजन झेपवू शकतो. तसेच गाढ झोप लागली आणि त्यामध्ये बाळ झोपेत खाली पडू नयेयासाठी संरक्षक बेल्टची व्यवस्था केलेली आहे. तो फोल्डेबल असल्याने त्याचा कोचमधील इतर प्रवाशांना अजिबात त्रास होत नाही.

रेल्वेतील लोअर बर्थचा विचार करूनच हा बर्थ तयार करण्यात आला आहे. समाजाची एक अडचण सोडविण्यासाठी एक घटक म्हणून आम्ही हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहोत. माझ्या पत्नीने जेंव्हा मला हि समस्या सांगितली, तेंव्हाच फोल्डेबल बेबी बर्थ या उपकरणाची कल्पना सुचल्याचे संशोधक नितीन देवरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular