27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriग्रामीण भागातील रोजंदार महिलांची समविचारी संघटनेकडे मागणी

ग्रामीण भागातील रोजंदार महिलांची समविचारी संघटनेकडे मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरु असल्याने, रोजंदारीसाठी अनेक महिला वर्ग ग्रामीण भागातून येत असतात. परंतु, एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील लोकांना मनस्ताप सहन कराव लागत आहे. सोबत आर्थिक भुर्दंड तो वेगळाच.

श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आजूबाजूच्या परिसरातील असंख्य महिला भगिंनी रोजंदारी कामासाठी स्थानिक उद्योग धंद्यात उदर निर्वाहासाठी कामाला येतात. एसटी.नसल्याने त्यांना खाजगी टेम्पो-रिक्षा किंवा मिळेल त्या वाहनाने कामावर हजार व्हावे लागते. मात्र गणपतीपुळे येथील स्थानिक पोलिस प्रशासनाने या प्रवासी वाहतूकीला मज्जाव केला असून, हातावर पोट असणाऱ्या या महिलांना लांबवरुन यायचे कसे हा प्रश्न सतावू लागला आहे.

त्यामुळे या त्रस्त महिलांनी राज्यात सगळीकडे एसटीच्या संपाच फटका सामान्य जनतेस बसू नये म्हणून  खाजगी वाहतूकीला प्राधान्य देण्यात आले असताना, केवळ श्रमिक महिलांसोबत हा अन्याय का! म्हणून या श्रमिक महिलांनी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, निलेश आखाडे, मनोहर गुरव आदी पदाधिका-यांकडे आपली समस्या मांडली.

विशेष म्हणजे स्थानिक वाहनधारक यांनी आपला व्यवसायिक दृष्टिकोन बाजूला सारून, एसटी संप म्हणून येथील स्थानिक महिलांना अवघ्या दहा रुपयात वाहनसेवा उपलब्ध करुन देत आहेत. तरीही मागील आठवडाभर येथील महिला पोलिस अधिकारी या वाहतूकीला बंदी घालून कामावर येणाऱ्या महिलांची अडवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. असे झाले तर या महिलांनी कामावर जायचे तरी कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत समविचारीचे पदाधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन याबाबतीत लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हातावर पोट असणाऱ्या आणि मोलमजूरी करणाऱ्या महिलांना होणारा हा अकारण त्रास न थांबविल्यास सनदशील मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेने दिला असून संबंधित महिलांनी संभाव्य लढ्याला पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular