24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraअखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष. मागील वर्षाची परीक्षा कोरोनाच्या संकटकाळामुळे रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचा असर काही प्रमाणात ओसरला असून शाळा, कॉलेज ऑफलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करूनच शासनाने शैक्षणिक संस्था सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? परीक्षा ऑनलाईन होणार कि ऑफलाईन ! याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना होती.  त्या तारखा आज अखेर जाहीर झाल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे.

राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. १० वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे.  तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा रद्द झाल्या होत्या. ओमिक्रॉन नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यामध्ये बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ७  एप्रिल दरम्यान असणार आहेत. तर त्यानंतर लगेचच दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावीच्या परीक्षा १५  मार्च ते १८  एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होत आहे. बारावीच्या तोंडी परीक्षा १४  फ्रेब्रुवारी ते ३ मार्च, आणि दहावीच्या तोंडी परीक्षा २५  फेब्रुवारी ते १४  मार्च कालावधीमध्ये होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular