28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

दिवा-चिपळूण मेमू’च्या जादा दोन फेऱ्या – कोकण रेल्वे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्यरेल्वेने अतिरिक्त गणपती...

वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात...

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...
HomeEntertainmentजेठालालच्या मुलीच्या लग्नाची चर्चा, सर्वांनी केले कौतुक

जेठालालच्या मुलीच्या लग्नाची चर्चा, सर्वांनी केले कौतुक

भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात जास्त पहिला जाणारा “तारक मेहता का उल्टा चष्मा”  हा कार्यक्रम  मानला जातो. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर या कार्यक्रम पाहायला अनेक जणांची पसंती आहे. तारक मेहता शोबद्दल बोलायचे झाले तर या शोचे सर्व कलाकार कुटुंबाच्या बाजूने कायम एकत्र उभे राहतात.

आजकाल, तारक मेहता का उल्टा चष्मा शो मधील सर्वात महत्वाचे पात्र असलेल जेठालाल,  ज्याचे खरे नाव दिलीप जोशी आहे.  सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे दिलीप जोशी यांच्या मुलीचे लग्न. लग्न हा प्रत्येक मुली आणि तिच्या पालकांच्या आयुष्यातील सुख आणि दु:ख यांचे अनोखे मिश्रण असलेला क्षण असतो. मुली तर आपल्या लग्नाबद्दलची अनेक स्वप्न रंगवलेली असतात. असा लुक, ड्रेस, सर्व माचिंग ज्वेलरी आणि बरेच काही. दिलीप जोशी यांची मुलगी नियती हिचे लग्न सुद्धा पारंपारिक पद्धतीने पार पडले.

जेठालाल यांनी त्यांच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये शोचे सर्व स्टार्स उपस्थित होते किंवा शो सोडून गेलेले स्टार देखील सहभागी झाले होते. जेठालालच्या मुलीने नुकतेच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लग्न केले, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध स्टार्स उपस्थित होते.

सध्या जेठालालच्या मुलीच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, त्यामुळे सर्वजण तिची चर्चा करत आहेत. त्यामध्ये वधू असलेल्या नियतीचे केस हे पांढरे झालेले दिसत असून तिने त्याचा संकोच न बाळगता आहे तसेच केसांची हेअरस्टाईल करून खूप आकर्षक रित्या स्वत:ला प्रेझेंट केले आहे.

नियतीचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. एक नेटकरी म्हणाला, पांढरे केसांमधला तिचा आत्मविश्वास हा पाहण्यासारखा आहे. दुसरा नेटकरी म्हणाला,  याचा आनंद आहे की अजुनही असे लोक आहेत, ज्यांना लोक काय म्हणतात याने काहींही फरक पडत नाही. आपण जसे आहोत तसच जगासमोर देखील राहणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, पांढरे केस असूनही तिचा आत्मविश्वास हा कौतुकास्पद आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला,  स्वत:च्या लग्नात पांढर केस ठेवण्यासाठी हिंमत पाहिजे, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular