जगभरातील कोरोनाचे संकट अनेकांच्या लग्नामध्ये अडचणी निर्माण करत होते. कित्येकांनी लग्न पुढे ढकलली तर काहींनी कोर्ट मेरेज केले. यामध्ये मराठी त्याचप्रमाणे हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लगीन घाई सुरु झाल्याचे दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचे बहुचर्चित कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा जैसलमेरमध्ये अगदी धुमधडाक्यात शाही पद्धतीने पार पडला. अनेक दिवसापासून या शाही विवाह सोहळ्याची सोशल मीडियापासून सर्वत्र चर्चा होती.
त्यानंतर आता बॉलिवूडचं आणखी एक बहुचर्चित उच्च कुटुंबातील क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. यानंतर एका मुलाखतीत खुद्द रणबीर कपूर म्हणाला होता कि, जर कोरोनाचं हे महाभयंकर संकट आलं नसतं तर, केव्हाच आम्ही लग्न केंव्हाच केल असत.
रणबीर आलियाच्या लग्नाची सनईदेखील लवकरच वाजणार असल्याच्या वृत्ताने चाहत्यांमध्येसुद्धा खुशीचे वातावरण पसरले आहे. मागील काही वर्ष एकमेकांना डेट करून आता ही जोडी अखेर पुढच्या टप्प्यावर पोहोचली असून त्यांनी अधिकृतपणे कपूर आणि भट्ट कुटुंब अर्थात आलिया आणि रणबीर एकत्र येणार असल्याचे सांगत, लग्नाच्या तयारीला लागले असल्याचं सांगितले आहे. अखेर आता लग्नाचा धुमधडाका सुरु झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आणि प्रशासनाच्या निर्बंधांमुळे रणबीर आणि आलियाला खूपच कालावधी वाट पहावी लागली. काही न काही कारणांमुळे दोघांच्या लग्नाचा मुहूर्त सतत पुढे ढकलला जात होता. तारीख जरी त्यांनी अजून अधिकृतपणे सांगितली नसली तरी, ते डेस्टिनेशन वेडिंग नसून ते दोघे मुंबईतच लग्न करणार आहेत आणि हे लग्न ताज लँड्स येथे होईल अशी विशेष माहिती समोर आली आहे. त्यांचं लग्न एक दिमाखदार सोहळा असणार आहे.