29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeMaharashtraभाजपच्या १२ आमदारांचं मी निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या निशाण्यावर – आम. जाधव

भाजपच्या १२ आमदारांचं मी निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या निशाण्यावर – आम. जाधव

विधानसभेच हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी चांगलच गाजलेलं पाहायला मिळाले. शिवसेना आम. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल आणि अंगविक्षेप केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी माफी मागावी नाहीतर त्यांचं निलंबन करण्यात याव अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.

सुरुवातीला मी काहीच माझ्या मनाचे बोललो नाही, जे मन. पंतप्रधान बोलले तेच मी फक्त पुन्हा बोलून दाखवले. कोणाचेही न ऐकण्याची भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधवांनी अधिवेशनाचे कामकाज बंद पडू नये म्हणून मग नंतर बिनशर्त माफी मागत असल्याचं सांगत विषय बंद केला. मात्र, १२ आमदारांचं निलंबन केल्यामुळेच मी भाजपच्या रडारवर असल्याची टीका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

पक्षातील वरिष्ठांनी मला सांगितलं की तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली आहे, तर तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेत बिनशर्त माफी मागितली. पण फडणवीसांना टोला लगावत म्हटल की, आम्ही एकाच शाळेतील विद्यार्थी आहोत. सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राहुल गांधी याची कशा तर्हेने टीका-टिप्पणी,  नकला केल्या त्याचा व्हिडीओ टाकला आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्तिगत टीका केली नाही.

भाजपच्या १२ आमदारांचं मी निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या निशाण्यावर आहे. मला कोणत्या गोष्टीत गुंतविता येईल याची ते संधी शोधत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याचा देखील त्यांच्या प्रयत्न आहे. पण वेळेनुसार मी त्याला योग्य उत्तर देईन, असं भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular