27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraपर्यावरण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, एकाला बंगळुरुमधून अटक

पर्यावरण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, एकाला बंगळुरुमधून अटक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप लावले आहेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला बंगळुरुमधून ताब्यात घेण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याचे नाव जयसिंग राजपूत असून, त्याला अटक करण्यात आली. धमकी देणारा जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मोठा चाहता असल्याचं सांगत आहे.

सुशांत राजपूतची आत्महत्या हा सगळ्या कलाकारांसकट सामान्य जनतेसाठी धक्कादायक बाब होती. एवढ्या कमी कालावधीमध्ये प्रसिद्धीचे शिखर गाठलेला तरीही जमिनीवर पाय असलेला सुशांत सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. जेवढी प्रसिद्धी जास्त, तेवढेच विरोधक अधिक हे समीकरणच आहे. आणि त्याचप्रमाणे चाहता वर्ग सुद्धा जास्त प्रमाणात असल्याने सुशांत राजपूतचे असे अचानक जाणे चाहत्यांच्या पचनी पडणारे नाही. नक्की त्यामागे कोणाचा हात, आत्महत्या कि घातपात याबाबत अजूनही चौकशी सुरु असून तपास लागला नसल्याने अजूनही अनेक चाहते अशी पाऊले उचलतात.

बंगळुरुहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश पाठवले होते. त्या मेसेजमध्ये त्याने आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंहच्या मृत्यूसंदर्भात आरोप लगावले होते. त्यानंतर त्याने तीन फोन देखील केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले, तेंव्हा संतापलेल्या त्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसा मेसेज देखील त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular