26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraकोरोनाच्या नवीन विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता असल्याने, या पार्श्वभूमीवर गृह विभागाने गांभिर्याने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे.

त्यामध्ये अनेक सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सोहळे, सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे विवाह सोहळे, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर लगाम लावण्यासाठी नियंत्रण घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे,  व्यायाम शाळांमध्ये आधीसारखेच केवळ ५०% उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

ख्रिसमस,  नववर्ष साजरे करताना गर्दी होऊ नये, आणि संसर्गाचा धोका वाढू नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. परंतु, या निर्बंधांचा काहीच महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. रेल्वेचा प्रवास, खाजगी, शासकीय कार्यालयीन उपस्थितीवर अजून तरी कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाही आहेत.

रुग्णसंख्या वाढीचा दर किंवा अन्य घटक लक्षात घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज भासल्यास अधिक कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. जाहीर कार्यक्रम सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहात १००, तर खुल्या वा मोकळ्या मैदानात २५० लोकांनाच उपस्थित राहता येण्याची परवानगी दिली गेली आहे. अन्य समारंभाला बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के, तर खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थितीला परवानगी तर क्रीडा स्पर्धांसाठी क्षमतेच्या २५ टक्केच प्रेक्षकांना परवानगी कायम करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular