27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriभगवती किल्यावरुन उडी घेत एकाची आत्महत्या

भगवती किल्यावरुन उडी घेत एकाची आत्महत्या

रत्नागिरीमधील प्रसिद्ध देवस्थान असलेले भगवती देवीचे मंदिर हे किल्ला परिसरामध्ये स्थित आहे. रत्नदुर्ग किल्यावर असलेले हे मंदिर आणि सभोवाताली असलेला अफाट समुद्र त्यामुळे त्याला एक वेगळेच सौंदर्य लाभलेले आहे. अनेक पर्यटक तिथे या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी फिरायला येतात. काल सुद्धा काही पर्यटक भगवती किल्ल्यावर गेले असता, काही पर्यटकांना तेथील बुरुजाखालील खोल दरीमध्ये एक मृतदेह दिसून आला.

पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तो मृतदेह त्या मंदिराच्या पायथ्याला पेठकिल्ला गावातील ३३ वर्षीय तरुणाचा असून त्याने रत्नागिरी नजीकच्या भगवती किल्ल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. अमोल कृष्णा चव्हाण  रा. पेठकिल्ला, रत्नागिरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भगवती मंदिर परिसरातील वेताळ बुरुजावरून उडी मारत त्याने आत्महत्या केल्याचे काही लोकांनी पहिले आणि त्याची खबर पोलिसांना दिली. अमोल चव्हाण हा आपली पत्नी आणि मुलांसह पेठ्कील्ला परिसरामध्ये राहत होता. मिळेल ते काम , मोलमजुरी करून तो आपला आणि कुटुंबाचा चरितार्थ भागवत होता. पोलिसांनी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मागील दोन दिवस घरीच आला नव्हता.

त्यामुळे मग त्याचा शोध घेणे सुरु होते. भगवती मंदिर परिसरामध्ये अनेक वेळा अशा आत्महत्येच्या घटना घडत असतात. किंवा काही ठिकाणी परिसराचा अंदाज नसल्याने अपघात घडून सुद्धा काही जण अपघाताने सुद्धा कड्यावरून खाली कोसळतात. आणि जखमी होतात. पर्यटकांनी पाहिल्यामुळे आणि वेळीच कळविल्यामुळे हि घटना उघडकीस आली. त्यांने का आत्म्हत्येच पाउल उचलले हे कारण मात्र अद्याप कळू शकलेल नाही.

RELATED ARTICLES

Most Popular