21.2 C
Ratnagiri
Saturday, November 15, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनवर केले मोठे भाष्य

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनवर केले मोठे भाष्य

महाराष्ट्रासह राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही रात्री ९ नंतर नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे.

मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सध्या तरी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच लॉकडाऊन कधी लावला जाऊ शकतो याची माहितीच दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन कोरोना संसर्ग, ओमिक्रॉनचा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर स्पष्ट भाष्य केलं.

तेंव्हा ते म्हणाले कि, यापुढे लॉकडाऊन लावताना केवळ ऑक्सिजनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्याचं ठरवले जाणार आहे. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल, तशी सद्य परिस्थिती दिसत आहे,  असं टोपे यांनी स्पष्ट केले.

ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. मागील दोन वर्ष अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अचनक आणि कडक निर्बंध लावावे लागले. आता आम्हाला निर्बंध लावायचे नाही आहेत. तसा आमचा कोणताही हेतू नाही. फक्त काळजी पोटीच, केवळ हा संसर्ग वाढू नये म्हणून आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular