आपल्या आवडत्या नेत्यासाठी चाहता कोणते पाऊल उचलेल सांगता येत नाही. बीड मधील एक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या आवडत्या व्यक्तीमत्वापैकी एक. त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया, त्यांचे आजारपण, त्यावर विरोधकांनी केलेय कुचेष्टा यातून त्या आजारपणातून ते लवकरात लवकर बरे होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. त्यांनी यासाठी ११०० किमी पायी चालत जाण्याचा दृढ निश्चय केला.
यापूर्वी २०१९ मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनावेत यासाठी सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केलेली. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांना ही बातमी समजल्यावर सुमंत रुईकर यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले होते आणि त्याचा सत्कार देखील केला होता.
एक डिसेंबर पासून ते बीडपासून, पायी तिरुपतीच्या वाटेवरचा प्रवास सुरु केला खरा, पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव हे दोघे रोज ३५ किलोमीटर पायी चालत, ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला पोहोचायचे निश्चित केले होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले.
पण रोज तीस ते पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकून गेले होते. त्यातच त्यांना ताप भरला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे इच्छित स्थळी पोहोचायचे होते. त्यांच्या तब्ब्येती बद्दल मित्राने घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होटी, मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत काढण्यात आली.
परत घरी येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर पोहोचण्या आधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे पायी निघाले. अंगात ताप असल्याच्ने, शरीरात त्राण राहिला नव्हता पण तरीही ते चालत राहिले. दरम्यान घरची मंडळी मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलत नव्हते. म्हणून अखेर घरच्या मंडळींनी बीड पोलिसात धाव घेतली आणि ते हरवल्याची नोंद केली.
पोलिसांनी फोन लोकेशन पाहिले असता, रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने २० किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला ते बेशुद्ध अवस्थेत कोसळले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांची प्रकृती खालवलेली होती, अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.