27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeLifestyleनात्यातील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी हे नक्की करा

नात्यातील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी हे नक्की करा

नात्यात कायम एक प्रकारची ओढ आणि गोडवा टिकून राहण्यासाठी काही सोपे मार्ग अवलंबले तर नक्कीच हा गोडवा आयुष्यभर टिकून राहील.

कोणतही नात टिकवायच असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूने तेवढेच प्रयत्न केले गेले पाहिजे. नात्यात कायम एक प्रकारची ओढ आणि गोडवा टिकून राहण्यासाठी काही सोपे मार्ग अवलंबले तर नक्कीच हा गोडवा आयुष्यभर टिकून राहील.

जेव्हा एखाद नवीन नात जुळत तेंव्हा ते नवीन नवीन असतं म्हणून सगळं व्यवस्थित असतं. त्यामध्ये  एकमेकांना वेळ देतो, भेटणे, गिफ्ट देणे, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे अशा गोष्टी घडतच असतात.  पण जसं जस नातं जुन होत जाते तसे, त्यात पहिल्यासारखं काहीच जाणवायला लागतं नाही. या मागे विविध कारणं असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर रुसवे, फुगवे, खटके उडू लागतात. पण नात टिकविण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या हेच नातं कायम टवटवीत रहायला मदत होईल.

सध्याच्या युगात आज नवरा-बायको असो किंवा प्रियकर-प्रियसी असो दोघेही शिक्षित असल्याने, नोकरी किंवा व्यवसाय करतात. त्यामुळे एकमेकांना ठराविक देण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांना क्वालिटी टाइम देणे गरजेचे आहे. एखादा छान प्लान करून दोघच बाहेर फिरायला जा. एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जा, त्यावेळेत एकमेकांचं बोलणं ऐकून घ्या.

स्रीया अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळविण्यात जणू जन्मजात निपुण असतात. त्यामुळे  नात्यात सुख टिकवून ठेवण्यासाठी शक्य तेव्हा पाटर्नरचं कौतुक करा. जर आपल्या पाटर्नरनं कौतुक केलं तर कोणाला आवडणार नाही. यामुळे नात्यांमध्ये नक्कीच गोडवा राहतो.

एखाद्यावेळी कारण नसताना सरप्राइज गिफ्ट दिले तरी पार्टनरला छान वाटते. गिफ्ट महागच असावं असं काही नाही, फक्त त्यात प्रेममय भावना दडल्या असाव्यात. या लहान गोष्टींमधुनच तुमच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आदर आणि आपुलकी कायम टिकून राहील.

आजकाल सगळ्यांना आपली अशी एक पर्सनल स्पेस लागते आणि ती देणं देखील गरजेचं आहे. प्रत्येकाची आपली एक विचार करण्याची पद्धत असते आणि आपल्या प्रकारे जगण्याची इच्छा असते. म्हणून सतत एकमेकांच्या गोष्टीत डोकावू नका. त्यामुळे नात्यात दुरावा येतो. दोघानीही एकमेकांना स्पेस दिल्याने नात्यात आनंद टिकवून ठेवता येतो.

RELATED ARTICLES

Most Popular