26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर राज्यात कठोर निर्बंध लावण्यास होणार सुरूवात – आरोग्यमंत्री

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर राज्यात कठोर निर्बंध लावण्यास होणार सुरूवात – आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच अचानक उद्भवलेल्या नव्या विषाणूच्या संकटाने पुन्हा एकदा देशात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना निदर्शनास येत आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये अधिक संख्येने वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या ११४९२ एवढी होती आणि आज ही संख्या २९ हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या १३०० कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, आज संध्याकाळी ही संख्येमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले गेले नाही आणि सर्व गोष्टी हलक्या घेतल्या गेल्या तर त्याची किंमत आपल्याला येत्या काळात मोजावी लागणार आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याला करणे आवश्यक आहे.

निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे बैठक घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात कडक निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे सुचविले आहे. आरोग्यमंत्री पुढे म्हणाले कि, लग्न समारंभ असतील किंवा इतर मोठे कार्यक्रम सुद्धा कुठलेही नियमांचे पालन न करता होत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांना आणि प्रशासनाला सांगून बंधने आणावी लागणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular