27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन कडून आयटीआयला मदत

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन कडून आयटीआयला मदत

रत्नागिरी नाचणेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पाण्याच्या पाईपलाईन करिता फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनने मदत केली.

रत्नागिरीतील फिनोलेक्स संस्था अनेक गरजू किंवा जिथे खरच एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा ठिकाणी वेळोवेळी मदत करताना दिसते. मग ती वस्तू स्वरुपात मदत असो किंवा आर्थिक स्वरुपात. फिनोलेक्सच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कार्याबद्दल अनेक स्तरातून त्यांच्याकडे मदतीसाठी मागावी येत असतात, आणि आवश्यकतेनुसार, फिनोलेक्स संस्था आपले मदत कार्य वेळेत तिथे पोहोच करते.

रत्नागिरी नाचणेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पाण्याच्या पाईपलाईन करिता फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनने मदत केली. यापूर्वी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने जिल्ह्यांमध्ये जलप्रकल्प सुरू केले आहेत आणि ते पूर्णत्वास सुद्धा नेले आहेत.

आयटीआय रत्नागिरीकडून मुलांच्या वसतिगृहासाठी पाण्याच्या पाईपलाईनसाठी आणि आवारातील वृक्षारोपण प्रकल्पासाठी प्लंबिंग साहित्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला फिनोलेक्सने तत्काळ प्रतिसाद आणि मंजुरी दिली. १०० विद्यार्थी राहणाऱ्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीला सतत पाणीपुरवठा, आंब्याच्या १५० रोपांना आणि बागेसाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. या प्रकल्पात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान केले आहे. पण कातळावर हि संस्था असल्याने काही प्रमाणात पाण्याचा तुटवडा भासत असतो.

या पाईपलाईनचे उद्घाटन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. कोतवडेकर आणि आयटीआयचे प्राचार्य श्री. शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी प्रकल्प समन्वयक श्री. मद्रे,  श्री. पवार,  फिटर प्रशिक्षक,  इतर आयटीआय कर्मचारी, विद्यार्थी आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव विद्यालयाची टीम उपस्थित होती. आयटीआयने या दोन्ही संस्थांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular