29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...
HomeDapoliबेपत्ता इसमाचा अखेर पाच महिन्यांनी लागला शोध

बेपत्ता इसमाचा अखेर पाच महिन्यांनी लागला शोध

दिनांक ३१ जुलै २०२१ पासून बेपत्ता असलेल्या सचिन बुरटे रा. खेर्डी पांढरीची वाडी येथील तरुणाचा असल्याची ओळख पटवण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.

शनिवार दि. १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खेर्डी गावातील शांताराम गायकर हे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी बावीचा आडवा या भागामध्ये एक सापळा स्थितीत असणारे प्रेत दिसून आले. त्यांनी याची कल्पना पोलीस आणि गावकऱ्याना दिली.

दापोली तालुक्यामधील खेर्डी या ठिकाणी मृतदेह आढळला असून हा मृत्यू सुमारे ५ महिन्यापूर्वी झालेला सचिन बुरटे याचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिनांक ३१ जुलै २०२१ पासून बेपत्ता असलेल्या सचिन बुरटे रा. खेर्डी पांढरीची वाडी येथील तरुणाचा असल्याची ओळख पटवण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. ३१ जुलै २०२१ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान सदर व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला असल्याची नोंद दापोली पोलिस स्थानकात घेण्यात आली आहे.

दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या खबरीनुसार त्या प्रेताच्या डाव्या हातात असणाऱ्या स्टील धातूच्या कड्यायावरून सदरचा प्रेत सापळा हा सचिन बुरटे याचाच असल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी अवनी बुरटे व गावातील ग्रामस्थांना याबद्दल माहिती दिली. त्या सर्वांनी जाऊन पाहणी केली असता सदर प्रेत हे सचिन बुरटे यांचे असल्याचे त्यांची देखील खात्री झाली. सचिन बुरटे हे बेपत्ता असल्याची खबर २ ऑगस्ट २०२१ रोजी दापोली पोलिस स्थानकात देण्यात आली होती. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शीतल पाटील करीत आहेत. पाच महिन्यानंतर अचानक निदर्शनास आलेल्या सापळ्याचा पोलिसांनी योग्य प्रकारे चौकशी करून शोध लावला.

RELATED ARTICLES

Most Popular