27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते सिम्युलेटर यंत्रणेचे उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते सिम्युलेटर यंत्रणेचे उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही या यंत्राचा प्रत्यक्ष वापर करून त्याचा अनुभव घेतला केले.

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन चालवण्याच्या चाचणीसाठी नवीन सिम्युलेटर यंत्रणा बसवण्यात आली आहे. वाहन कसे चालवायचे! वाहन चालवण्यासाठीचे नियम, वाहन चालवण्याचा सराव याची इत्यंभूत माहिती या यंत्रणेद्वारे मिळणार आहे. त्यामुळे जेंव्हा प्रत्यक्षरीत्या वाहन चालवण्याची वेळ येईल तेंव्हा चालकाला वाहन चालवण्यातील त्रुटी, वाहतुकीचे नियम याबाबत आधीच या यंत्रणेवरून माहिती समजल्याने एक प्रकारे सोपे जाणार आहे.

या सिम्युलेटरचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर,  सहाय्यक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर, मोटर निरीक्षक संतोष काटकर, ऋषिकेश कोराने,  प्रसाद सानप आदी उपस्थित होते. यावेळी या यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही या यंत्राचा प्रत्यक्ष वापर करून त्याचा अनुभव घेतला.

आणि त्यावर आपली प्रतिक्रियाही दिली. सराव करून घेणाऱ्या या सिम्युलेटर अत्याधुनिक प्रणालीचा वाहन परवान्यासाठी चांगला फायदा होईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर व्यक्त केले. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालवण्याची चाचणी देण्यासाठी येणाऱ्यांना चाचणीपूर्वी या सिम्युलेटरवर सराव करता येणार असल्याने प्रत्यक्षात परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये तेवढे भय राहणार नाही. आणि नि:संकोचपणे वाहन चालक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यास मदत होईल.

प्रत्यक्ष चाचणीच्यावेळी जसे चढ, उतार, गतिरोधक अशा गोष्टी असतात, त्यानुसारच या यंत्रणेची सुद्धा मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये विविध कृत्रिमरित्या विविध परिस्थिती निर्माण केलेल्या आहेत. ज्यामध्ये अति वृष्टी झाली,  धुकं पसरलं, अंधार दाटला, घाटरस्ता, तीव्र उतार, तीव्र चढण यामुळे या परिस्थितीमध्ये वाहन कसे सांभाळून चालवायचे, याचा या सिम्युलेटर यंत्रावर सराव करताना याची मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular