28.2 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeDapoliअनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही

अनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही

निवडणुका येतच राहतील, पदे येतील, जातील. आम्ही आजन्म शिवसैनिकच राहणार

शिवसेना अंतर्गत सुरु असलेले वाद आता चांगलेच उफाळले असून, अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामदास कदम, किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यात निर्माण झालेल्या वादाचे अनेक पडसाद उमटले आहेत. शिवसेनेमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजगी दिसून येत आहे. त्यामध्ये अनिल परबांचे अनपेक्षित वागणे त्यामुळे दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी येथील शिवसैनिकांवर दाखवलेल्या अविश्‍वासाने दापोली शहरातील शिवसैनिक नाराज झाले आहेत.

पालकमंत्री अनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही. पालकमंत्र्यांच्या येण्या आधीपासूनच आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका येतच राहतील, पदे येतील, जातील. आम्ही आजन्म शिवसैनिकच राहणार, असे प्रतिपादन करत आमदार योगेश कदम यांचेच नेतृत्व आम्ही मानणार, असा नारा शहरातील शिवसैनिकांनी दिला.

माजी नगराध्यक्ष आणि शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र पेटकर यांच्या उपस्थितीत दापोली शहरातील कोकंबा आळी येथील शिवसेना तालुका संपर्क कार्यालयासमोर शहरातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या जयजयकारच्या घोषणानी परिसर दणाणून सोडत आमदार योगेश कदम यांना पाठिंबा दर्शविला.

रामदास कदम आणि कुटुंबावर शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांची नाराजगी असल्याची वृत्ते विविध माध्यमांतून पुढे येत होती. त्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी रामदास कदमांची अनुपस्थिती या गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असून निव्वळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात नजरेस पडतात. अशे वक्तव्य कदमांनी परबांच्या बाबत केले होते. दापोली परिसरातील शिवसैनिक अनिल पराबांवर नाराज असून, त्यांनी आम. योगेश कदम यांनाच कायम पाठींबा दर्शवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular