26.1 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeRatnagiriशुल्लक कारणावरून येथे दोन गटात हाणामारी, दोन्ही बाजूने तक्रार दाखल

शुल्लक कारणावरून येथे दोन गटात हाणामारी, दोन्ही बाजूने तक्रार दाखल

एकूण १० जणांवर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेर्डी कातळवाडी येथे दोन गटात शुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकूण १० जणांवर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद विकास सुरेश दाते यांनी दिली. विकास दाते यांच्या तक्रारीनुसार, गोठ्यातील गाय टेरव येथील कदम यांना देऊन ती घेऊन जात असताना सामाईक जागेत मधूकर दाते यांनी लाकडाची बेडे लावलेले होते. ते विकास दाते यांच्या वडिलांनी बाजूला केले. हे बेडे बाजूला करताना मधुकर दाते यांनी पाहिले व त्यांनी विकास यांना आमच्या बेड्याला का हात लावला? असे म्हणत हातात काठी घेऊन विकास यांचे वडील व त्यांचा भाऊ यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करू लागले.

त्या भांडणाचा आवाज ऐकून विकास दाते यांची वहिनी व आई त्या ठिकाणी आल्या असता बेडे लावण्याची काय गरज आहे?  अशी विचारणा केली. याचा राग आल्याने, मधुकर दाते यांनी विकास यांना काठीने मारहाण केली. त्यांच्यासह सुधाकर, अभिनाथ व मिनाक्षी दाते या चौघांनी शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली व काठीने मारहाण केली. तसेच दगड भिरकावून मारल्याने विकास जखमी झाले आहेत. अशी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मधुकर दाते, सुधाकर दाते, अभिनाथ दाते, मिनाक्षी दाते सर्व रा. खेर्डी कातळवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूने सुधाकर रामा दाते यांनी फिर्याद दिली आहे. सुधाकर यांच्या राहत्या घरात असलेले लाकडी बेडे सुरेश दाते यांनी काढून फेकून दिल्याचा प्रकार त्यांचा भाऊ मधुकर यांनी पाहिला. बेडे काढून का फेकून दिले?  अशी विचारणा सुरेश दाते यांना केली असता याचा राग मनात धरून मधुकर यांना धक्काबुक्की केली. यावेळी सुधाकर दाते हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता विकास, विपुल व मनोज दाते या तिघानी सुधाकर दाते यांना लाकडी दांडक्यानी मारहाण केली. तसेच या तिघांसह वैभवी, सरस्वती, सुरेश यांनी देखील सुधाकर व मधुकर यांना परत आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. अशी तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES

Most Popular