25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगुरुशिष्य नात्याला काळिमा फासणाऱ्या “त्या” शिक्षकाला पोलीस कोठडी

गुरुशिष्य नात्याला काळिमा फासणाऱ्या “त्या” शिक्षकाला पोलीस कोठडी

मागील काही वर्षांपूर्वी देखील या शिक्षकाने असाच प्रकार केल्याने, त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला होता.

गुरु आणि शिष्याचे नाते हे कायमच आदर्शवत असते. हि परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. पण सध्याच्या काळात अशा काही घटना घडतात कि, या नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. केवळ हेच गुरु शिष्याचे नाते नव्हे, जवळच्या सर्वच नात्यांबद्दल मन विषन्न होते. देशात विविध ठिकाणी घडणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर अत्याचार, विनयभंग, बलात्कार, अश्लील चाळे या गोष्टी कानावर आल्या तरी संताप निर्माण होतो.

रत्नागिरी तालुक्यातील पाली नजिकच्या एका गावातील प्राथमिक शाळेत पहिलीतील चिमुरड्या मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामीण पोलीसांनी शनिवारी रात्री अटक केली. संबधीत शिक्षक सुमारे ५० वर्ष वयाचा असून, त्याने या पहिलीतील मुली बरोबर केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास ग्रामीण पोलीसांमार्फत सुरु आहे. मागील काही वर्षांपूर्वी देखील या शिक्षकाने असाच प्रकार केल्याने, त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रमेश जाधव वय ५०,  रा.संगमेश्वर, रत्नागिरी असे या पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

काही वर्षांपूर्वी सुद्धा ग्रामस्थांनी अद्दल घडविल्यानंतर सुद्धा पुन्हा तसेच अश्लील कृत्य करण्याची हिम्मत त्या शिक्षकाने केली. त्यामुळे ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांचा सहारा घेतला. अशा काही शिक्षकांमुळे संपूर्ण आदर्शवादी शिक्षकी पेशाला काळिमा फासला जातो. नकळत त्या गुरु शिष्याच्या नात्या बद्दल बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हल्ली पालक सुद्धा खूप सतर्क झाले असल्याने, अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याच प्रमाण कमी झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular