29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

धामणीत काजू कारखाना आगीत खाक…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू...

चिपळुणात एक ‘सीएनजी’ एसटीसाठी आरक्षित – आगाराचा प्रस्ताव

शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर सीएनजी...

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...
HomeDapoliअनधिकृतरित्या सागवान वृक्षांची तोड, तिघांवर गुन्हा दाखल

अनधिकृतरित्या सागवान वृक्षांची तोड, तिघांवर गुन्हा दाखल

साग प्रकारातील झाडांची परवानगी शिवाय तोड करणे कायद्याने गुन्हा आहे.

सर्वत्र सुरु असलेल्या काँक्रीटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड केली जात आहे. त्यामुळे वन्यजीव आसरा शोधत मानवी वस्तीत शिरू लागत आहेत. शासनाने वृक्षतोडी वर बंदी घातली असताना सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली आहे.

काही विशेष प्रकारातील झाडे असतात त्याच्या लागवडीसाठी सुद्धा शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे तोड करण्यासाठी सुद्धा शासनाची परवानगी आवश्यक आहे. साग प्रकारातील झाडांची परवानगी शिवाय तोड करणे कायद्याने गुन्हा आहे.

दापोली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात बांधतिवरे शिवाजीनगर येथे ३ सागवान जातीची झाडे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडल्याप्रकरणी सुनील धोपट, राजेश दुसार, प्रमोद वाडकर या तिघांना परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. चोरीच्या तोडण्यात आलेल्या झाडांचे चिरकाम दापोलीमधील लक्ष्मी विजय सॉमिल येथे करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी संबंधित सॉमिलधारकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७ जानेवारी रोजी परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधतिवरे येथे वन कर्मचारी फिरती करिता बाहेर पडले असता, शिवाजीनगर बांधतिवरे येथील ३ सागवानी झाडे तोडल्याची त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा भारतीय वन अधिनियम नुसार वनरक्षक बांधततिवरे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना लक्ष्मी विजय सॉमील येथे चिरकाम केलेले लाकूड आढळून आले.

याप्रकरणी ३ आरोपींना अटक करून चिरकाम केलेल्या संपूर्ण मुद्देमालासह सागवान लाकूड माल, लोखंडी करवत व या चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिक अप गाडी ताब्यात घेण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दापोली यांच्यासमोर सर्व आरोपींना हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular