27.3 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeEntertainmentबॉलिवूड स्टार्स किती आकारतात खासगी कार्यक्रमाची फी !

बॉलिवूड स्टार्स किती आकारतात खासगी कार्यक्रमाची फी !

अनेक बॉलिवूड स्टार्स लग्न आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भरमसाठ फी आकारतात. जाणून घेऊया थोडक्यात कोणत्या स्टारची किती फी आहे ती !

हिंदी, मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेता अभिनेत्री अनेक समारंभाला उपस्थित राहत असलेले आपण बातम्यामध्ये पाहतो. त्यामध्ये ती लोक डान्स करत असतात, मज्जा मस्ती करताना दिसतात. पण काही वेळा अनोळखी किंवा एखाद्या बड्या राजकारण्यांच्या लग्नामध्ये सुद्धा या तारकांची मांदियाळी दिसते.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजयच्या लग्नामध्ये दिसला होता. त्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान देखील त्यांच्या कुटुंबासोबत दिसत आहे. त्यांच्या सोबत नाचताना दिसत आहे.

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना चाहते प्रश्न विचारत आहेत की,  सलमान या लग्नात कुठलेही नाते नसताना का नाचतोय? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक बॉलिवूड स्टार्स लग्न आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भरमसाठ फी आकारतात. जाणून घेऊया थोडक्यात कोणत्या स्टारची किती फी आहे ती !

bollywood stars

सलमान खान – सलमान आतापर्यंत अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतो. खासगी कार्यक्रमांसाठी सलमान २ कोटी रुपये फी आकारतो.

कतरिना कैफ – कतरिना जशी सौंदर्याने छान आहे तशीच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. ती खाजगी कार्यक्रम किंवा लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तब्बल ३.५ कोटी रुपये घेते. बॉलिवूडमधील खासगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कतरिना सर्वाधिक फी घेते.

शाहरुख खान- शाहरुख खानसुद्धा अनेक कार्यक्रममध्ये सक्रीय दिसतो. विविध विवाह सोहळ्यांना देखील हजेरी लावताना आपण पाहिले आहे. एका कार्यक्रमासाठी तो ३ कोटी रुपयांपर्यंत फी आकारतो.

प्रियांका चोप्रा – सध्या ग्लोबल स्टार असलेली प्रियांका, प्रत्येक इव्हेंटसाठी सुमारे अडीच कोटी रुपये फी आकारते. उदयपूर येथे ईशा अंबानीच्या लग्नाला तिने हजेरी लावली होती.

हृतिक रोशन – बॉलिवूडचा डान्सिंग किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन कोणत्याही खाजगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी सुमारे २.५ कोटी रुपये आकारतो.

दीपिका आणि रणवीर सिंह – दीपिका पदुकोण चित्रपटां व्यतिरिक्त अनेक खासगी कार्यक्रमातूनही कोटीमध्ये कमी करते. तर रणवीर इतका उत्साही आहे की प्रत्येकजण त्याला आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करू इच्छितो आणि जोशपूर्ण वातावरण तयार करू इच्छितो. दीपिका आणि रणवीर दोघही खाजगी इव्हेंट्समध्ये परफॉर्म करण्यासाठी १ कोटी रुपये घेतात.

RELATED ARTICLES

Most Popular