25.3 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriग्रामपंचायत पोट निवडणूक क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी रत्नागिरी

ग्रामपंचायत पोट निवडणूक क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी रत्नागिरी

ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी १८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

रत्नागिरी जिल्हयामध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले असून काही ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका १८ जानेवारीला आहेत. मंडणगड, दापोली, खेड व चिपळूण या तालुक्यातील पोट निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी १८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील वेहेळे ग्रामपंचायत, प्रभाग क्र.३, मतदान केंद्र १, मंडणगड तालुक्यातील पडवे ग्रामपंचायत  प्रभाग क्र.३, मतदान केंद्र १, दापोली तालुक्यातील टांगर ग्रामपंचायत प्रभाग क्र.२, मतदान केंद्र १, खेड तालुक्यातील सोनगांव ग्रामपंचायत, प्रभाग क्रम. ३, मतदान केंद्र १, या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी सुधारित निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या कडील दि. १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये प्राप्त झालेला असून सदर कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्हयात वरील तालुक्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका घेण्यात येत आहेत.

सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाचा दिवस १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणूका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारानुसार मंगळवार १८ जानेवारी २०२२  रोजी रत्नागिरी जिल्हयामध्ये मंडणगड, दापोली, खेड व चिपळूण या तालुक्यातील पोटनिवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वाना मतदान करण्यासाठी सुट्टी घ्यावी लागणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular