26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeDapoliदापोलीत माकडांच्या उपद्रावामुळे दोन खोके आगीत जळून खाक

दापोलीत माकडांच्या उपद्रावामुळे दोन खोके आगीत जळून खाक

दोन खोके आगीत जळून खाक झाले असून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.

दापोली शहरात दोन दुकानांना आज रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली. शहरातील कामगार गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या खोक्यांना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. यामध्ये दोन खोके आगीत जळून खाक झाले असून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सुट्टी असल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार १६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील कामगार गल्ली या परिसरात माकडांचा एक कळप आला. उड्या मारत असताना अचानक एका माकडाने इलेक्ट्रिक पोलवर उडी मारत मेन वायर तोडली आणि ती थेट एका खोक्यावर जाऊन पडली. यावेळी वीजपुरवठा सुरू असल्याने खोक्याने पेट घेतला. आणि क्षणात खोक्यातील शिलाई मशीन, ओव्हरलॉक मशिन व कपडे तसेच दुसऱ्या खोक्यातील रेडिमेट कपडे यांनी पेट घेतला. यामध्ये दोन्ही खोक्यातील साहित्य जळून खाक झाले असून यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.

रविवार असल्याने हे दोन्ही गाळे बंद असल्याने कोणत्याची प्रकारे जीवित हानी झाली नाही. दरम्यान खोके व्यापारी संघटनेमार्फत जयवंत गोरीवले- रा. चंद्रनगर व संगीता नरवणकर-रा. लाडघर या दोन खोके धारकांना आर्थिक सहाय्य करण्याचे ठरवले आहे. ही आग तेथील स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी आग विझवली.  आग आटोक्यात आणण्यासाठी अशोक कांबळे, राजेश पवार, अमोल पवार, जयवंत बोरजे, उत्तम कांबळे यांनी विशेष अथक प्रयत्न केले.

जंगलव्याप्त भागातून फळे आणि शेतीची नासधूस करण्यासाठी माकडांचे कळप मोठ्या प्रमाणात येतात. माकडांनीच उडी मारल्यामुळे विजप्रवाहित तार तुटून दुकानांना आग लागली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

RELATED ARTICLES

Most Popular